औरंगाबाद वृत्तसंस्था । औरंगाबादमध्ये कोरोनाच्या आजारातून बरे झालेल्या व्यक्तींची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आतापर्यंत १०४९ जणांना करोनावर मात केली आहे. शहरातील करोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्कय़ाहून अधिक आहे. आज सकाळी औरंगाबादमधील विविध वसाहतींमध्ये ५५ नवे रूग्ण आढळले आहेत. आता एकूण करोनाबाधितांची संख्या १६४२ झाली आहे. औरंगाबादमध्ये ५१४ जणांनावर उपचार सुरू आहेत. ७९ जणांचा करोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे.
आज आढळलेल्या ५५ करोनाबाधितांमध्ये २४ महिला आणि ३१ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. येथील एका खासगी रुग्णालयामध्ये खिवंसरा पार्क, गारखेडा परिसरातील कोरोनबाधित असलेल्या ६४ वर्षीय पुरूष रुग्णाचा एक जून रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत ६३, तीन खासगी रुग्णालयांमध्ये एकूण १५, मिनी घाटीमध्ये १ करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण ७९ करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले.
आढळून आलेले रूग्ण याप्रमाणे
शहा बाजार (1), किराडपुरा (2), चंपा चौक (1), कटकट गेट (1), नारळीबाग (1), गणेश कॉलनी (1), जवाहर नगर (3), भीम नगर (2), हमालवाडी (1), शिवशंकर कॉलनी (2), नाथ नगर (2), ज्योती नगर (1), फजलपुरा परिसर (1), मिल कॉर्नर (1), एन-3 सिडको (1), एमजीएम परिसर (1), रोशन गेट (1) , विशाल नगर, गारखेडा परिसर (1), एन-सहा संभाजी कॉलनी (7), समता नगर (5), अंहिसा नगर (1), मुकुंदवाडी (1), विद्या निकेतन कॉलनी (1), न्याय नगर (1), बायजीपुरा (2), संजय नगर, मुकुंदवाडी (4), विजय नगर (2), यशवंत नगर, पैठण (1), चंपा चौक, म्हाडा कॉलनी (1), नेहरु नगर (1), जुना मोंढा नाका परिसर (1), अन्य (3) या भागातील कोरानाबाधित आहेत.