Home आरोग्य दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही बाधित रूग्ण आढळला नाही

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही बाधित रूग्ण आढळला नाही

0
26

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात एकही बाधित रूग्ण आढळला नाही. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

 

जिल्ह्यत आज दिवसभरात एकही कोरोना बाधित रूग्ण आढळून आलेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ७८५ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २०२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५७७ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ६ कोरोना बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.


Protected Content

Play sound