जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कोविडची रूग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत असतांना गेल्या चोवीस तासांमधील रूग्णसंख्येचा आकडा हा दिलासा देणारा ठरला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाच्या रूग्णांची संख्या कमी होतांना दिसून येत आहे. या पार्श्वभूमिवर, गेल्या चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात फक्त ७ कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. यात अमळनेरातील ३; चोपडातील चार पेशंटचा समावेश आहे तर उर्वरित तालुक्यांमध्ये एकही पेशंट आढळून आलेला नाही. दरम्यान, गेल्या २४ तासांमध्येच जिल्ह्यातील ८४ कोरोना रूग्ण बरे झाले आहेत. सध्या जिल्ह्यात २५६ कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. यामुळे कोरोनाची लाट ओसरण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून आले आहे.