भुसावळ प्रतिनिधी । महानिर्मितीची अत्यावशक सेवा असतांना दीपनगर परीसरातील कर्मचारी, अधिकारी यांच्या घरातील उपकरणे दुरुस्त केली जाणार नाही असा आदेश काढण्यात आला आहे. यामुळे उपकरण दुरूस्ती व्हावी अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.
देशात सर्वत्र कोरोनाचा कहर असतांना दीपनगर वीज प्रशासनाने वसाहत लॉकडाऊन व इतर गर्दी होणारे सर्व कार्यक्रम रद्द केले असले तरी उत्यावशक सेवा देणार असे लेखी अश्वासन दिले आहे. किंबहुना दीपनगर वसाहतीत एखाद्या अधिकारी, कर्मचारी यांच्या घरातील उपकरणे अचानक बंद झाली तर विद्यूत परीरक्षण विभागातील कोणता ही ड्युटी वरील कर्मचारी दुरुस्ती करण्यासाठी वसाहतीत घरी येणार नसल्याचा फतवा व्यवस्थापनाने काढल्याने परीसरात चिंतेचा विषय निर्माण झाला आहे. मुख्य म्हणजे येथील अधिकारी, कर्मचारी तिन्ही शिप्टमध्ये काम करतात दुदैवाने तसे झाल्यास त्यांना बरेच दिवस अंधारात राहावे लागेल. या सर्व प्रकारामागे येथील हेकेखोर अधिकारी असल्याने अशा फतव्याचा संघटनांनी विरोध करणे गरजेचे आहे. कारण महावितरण मधील कर्मचारी ग्राहाकांची अशी तक्रार आल्यास तातडीने जावुन दरूस्त करत आहेत.
वास्तविक वसाहत लॉक केल्याने येथे येणे बंद झाले आहे. शिवाय येथे कोणतीही व्यक्ती कोरोना ग्रस्थ क्युंवा संशयीत नाही. दीपनगर व्यवस्थापनाने मास्क,सॅनेटाईझर अद्याप उपलब्ध करून दीलेली नाही ती सादने तातडीने उपलब्ध करुन द्यावीत. महाराष्ट्र शासनाच्या आदेशा नुसार किराणा दुकाने, दुध डेअरी, पिठाच्या गिरण्या, पंचरची दुकाने, ही उघडी ठेवली पाहीजेत अशी मांगणी कमगार नेते अरुण दामोदर, भरत पाटील, जितेंद्र वराडे यांनी महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन युनियन दीपनगरतर्फे केली आहे. कामगार नेते अरुण दामोदर, भरत पाटील, जितेंद्र वराडे यांनी केली.