जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील बळीराम पेठ येथील माहेर असलेल्या विवाहितेला दारूड्या पतीकडून शिवीगाळ व मारहाण केल्याची प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रविवार १३ मार्च रोजी दुपारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, बळीराम पेठ येथील माहेर असलेल्या सुनयना ज्ञानेश्वर लोहार (वय-३१) यांचा विवाह ३० एप्रिल २००८ ज्ञानेश्वर तुकाराम लोहार रा. गेवराई ता. गेवराई जि.बीड यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. त्यांच्या संसारवेलीवर तीन अपत्य झाले. लग्न झाल्यानंतर सुरुवातीला पती ज्ञानेश्वर लोहार यांनी चांगली वागणूक दिली. त्यानंतर त्यांना दारूचे व्यसन जडले. दारू पिऊन येऊन घरात शिवीगाळ करणे, मारहाण करणे हे सुरू झाले. त्यानंतर शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली. याबाबत विवाहितेच्या आईवडिलांनी विवाहितेला समजूत घालून पुन्हा नांदविण्यास पाठविले. तरीदेखील यासाठी जेठ, ननंद यांनी देखील टोमणे मारणे सुरू केले. त्यात मानसिक व शारीरिक त्रास दिला. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता जळगाव येथील माहेरी निघून आल्या. यासंदर्भात विवाहितेने जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रविवार १३ मार्च रोजी दुपारी पती ज्ञानेश्वर तुकाराम लोहार, जेठ भागवत तुकाराम लोहार, ननंद छाया तुकाराम लोहार, भिकुबाई नारायण लोहार, प्रमिलाबाई बाळू वाघ सर्व रा. गेवराई जि. बीड यांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करीत आहे.