जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील राजीव गांधी नगरात दारुच्या नशेत पतीने काही एक कारण नसतांना पत्नीला धारदार शस्त्राने मारहाण करुन दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात पतीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, राजीव गांधी नगरात संगीता रमेश झेंडे या वास्तव्यास आहेत. शनिवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास संगीता यांना काही एक कारण नसतांना त्यांचे पती रमेश झेंडे यांनी दारुच्या नशेत शिवीगाळ करत चापटा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यादरम्यान धारदार वस्तूने संगीता यांच्या डाव्या कानाच्या खाली दुखापत केली. यात संगीता झेंडे या जखमी झाल्या असून त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन त्यांचे पती रमेश बाबासाहेब झेंडे वय ४५ याच्याविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील हे करीत आहेत.