Home Cities अमळनेर दाम्पत्यासह मुलाला बेदम मारहाण

दाम्पत्यासह मुलाला बेदम मारहाण


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील रामेश्वर खुर्द येथे काहीही कारण नसतांना दाम्पत्यासह मुलाला शिवीगाळ करून बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील रामेश्वर खुर्द येथील रहिवाशी प्रभाकर धुडकू पाटील (वय-२४) हे अपल्या पत्नी व मुलासह वास्तव्याला आहे. ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास काहीही कारण नसतांना गावातील मच्छिंद्र चंद्रसिंग जाधव, राजेंद्र चंद्रसिंग जाधव, अविनाश प्रताप जाधव, नितीन छोटू जाधव, मनोज संजय जाधव, प्रेम अविनाश जाधव आणि अमोल छोटू जाधव सर्व रा. रामेश्वर खुर्द ता. अमळनेर यांनी दारूच्या नशेत येवून प्रभाकर पाटील यांनी शिवीगाळ केली तर त्यांची पत्नी लताबाई पाटील आणि मुलगा संदीप यांना बेदम मारहाण केली. यात तिघे जण गंभीर जखमी झाले. तिघांना जीवेठार मारण्याची धम‍की दिली. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक लक्ष्मीकांत शिंपी हे करीत आहे.


Protected Content

Play sound