मुंबई -लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याची घोषणा केली असून गोविंदांना नोकरीत आरक्षणाचा मार्ग देखील यातून मोकळा झाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दहीहंडीचा खेळात समावेश करण्यात आल्याची घोषणा केली आहे. प्रो कबड्डी प्रमाणे राज्यात प्रो दहीहंडी स्पर्धा सुरू केल्या जाणार आहेत. या व्यतीरीक्त दहीहंडी खेळणार्या गोविंदाना सरकारी नोकरीत देखील प्राधन्य दिले जाणार आहे. सरकारी नोकरीमध्ये गोविंदाना ५ टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले. याबाबतचा जीआर देखील आज काढण्यात आलेला आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्यात प्रो कब्बडी प्रेमाणे प्रो दहीहंडी सुरू केली जाणार आहे. दहीहंडी आता एक दिवस नाही तर ३६५ दिवस खेळली जाणार आहे. सोबत गोविंदांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महत्वपूर्ण निर्णय देखील राज्य सरकारने घेतले आहेत. दहीहंडी उत्सवातील गोविंदांना विमा संरक्षण दिले जाणार आहे. दहीहंडी खेळत असताना एखाद्या गोविंदाचा मृत्यू झाल्यास दहा लाख तर गंभीर जखमी झाल्यास ७:५० लाख रुपये दिले जाणार आहेत. हात पाय जायबंदी झाल्यासा ५ लाखांची मदत केली जाणार आहे. दहीहंडीसाठी स्थानिक आवश्यक परवानग्या असणे गरजेचे आहे, न्यायालय, प्रशासन व पोलीस यंत्रणेकडून वेळोवेळी देण्यात येणार्या सुचनांचे आयोजक संस्था तसेच गोविंदा पथकांनी पालन करणे आवश्यक आहे,