यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता स्वॅब तपासणी शिबीर घेऊन नागरिकांची अॅन्टीजन चाचणी घेतली असता दहीगाव व कोरपावली येथील ७ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत ब-हाटे, डॉ. गौरव भोईटे, डॉ. नसीमा तडवी व डॉ. प्रवीण ठाकरे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडासिम यांच्या मार्गदर्शनाखाली सावखेडासिम प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत दहिगाव ग्राम पंचायत येथे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. खालीद शेख व राजेंद्र बारी तर कोरपावली येथे डॉ. रोशन आरा शेख व बालाजी कोरडे यांनी कोरोनाबाबतच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनाबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. दरम्यान, दहिगाव येथे सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी कोरोना स्वॅब तपासणी (टेस्ट) करून घेतली. यात सरपंच अजय अडकमोल , उपसरपंच किशोर महाजन, सुरेश आबा पाटील, देविदास नाना पाटील, सत्तार तडवी, रवींद्र चौधरी, रजनीबाई बडे, आशाबाई पाटील, पल्लवी महाजन, दिलीप सरोदे, विजय पाटील, सुधाकर पाटील आदि ग्रा.पं. चे पदाधिकारी , कर्मचारी , कोरोनाचे लक्षणे असलेले व पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील अशा १६ व्यक्तींची स्वॅब घेऊन रॅपिड अॅन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात दहिगाव येथे ४ व्यक्ती तर कोरपावली येथे तीन व्यक्ती पॉझिटिव्ह आढळुन आले आहे.
शिबीर यशस्वीतेसाठी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. खालीद शेख, डॉ. रोशन आरा शेख, राजेंद्र बारी, बालाजी कोरडे , आशा सेविका व ग्रामपंचायत सरपंच सर्व सदस्य यांचे विशेष सहकार्य लाभले.