यावल,प्रतिनिधी| तालुक्यातील दहीगाव येथील पूर्वेकडील रस्त्याच्या नाल्याला पाऊसामुळे पाणी मोठ्या प्रमाणात साचलेला असल्यामुळे नाल्याकाठावरील नागरिकांच्या घरात पाणी घुसले आहे. यामुळे नाल्याला संरक्षण भिंत बांधून देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तालुक्यातील दहीगाव येथील मोहराळा व कोरपावली रस्त्याच्या पूर्वेकडील नाल्यात पाऊसामुळे नेहमी पाणी साचलेला असतो. परिणामी नाल्याकाठावरील नागरिकांना ये-जा करण्यास खूप अडचण येत आहे. यामुळे स्थानिक विकास निधीतून नाल्याला संरक्षण भिंत बांधून देण्यात यावी अशी मागणी आमदार लताताई सोनावणे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तुषार पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र सोनावणे, सरपंच अजय अडकमोल व ग्रामस्थ उपस्थित होते.