यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील दहिगाव येथे आमदार शिरीष चौधरी व आमदार लताताई सोनवणे यांच्या सहकार्याने व मागदर्शनाखाली संजय गांधी निराधार समिती आपल्या गावी आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष शेखर सोपान पाटील यांच्या संकल्पनेतुन हे अभीयान सुरू करण्यात आले आहे. याप्रसंगी जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे , संजय गांधी समितीच्या नायब तहसीलदार बबीता भुसावरे , दहिगावचे प्रथम नागरीक सरपंच अजय अडकमोल, कोऱपावलीचे सरपंच विलास अडकमोल , ग्राम पंचायत सदस्य तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक देविदास धांगो पाटील, अॅड .देवकांत पाटील यांच्यासह गावातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले. या अभियानास दहीगावकर ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. शेखर सोपान पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील विविध गावात संगोयो समितीचे सदस्य व स्थानिक ग्रामपंचायत पातळीवरील कर्मचारी हे घरोघरी जावुन या योजनेस पात्र अशा लाभार्थ्यांच्या समस्या व अडीअडचणी जाणुन घेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करून त्यांना न्याय मिळुन देणार आहे. तरी गरजुंनी आपल्या हक्काच्या माणसांजवळ आपल्या दैनदिन समस्या, शासकीय योजना ,आरोग्य, शैक्षणीक व इतर विषयांची माहीती घेवुन सर्वतोपरीने प्रयत्न करणार असल्याची माहिती शेखर पाटील यांनी दिली.