यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील दहिगाव येथे एका विवाहीत तरुणाची आपल्या राहत्या घरात गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली असून याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहीती अनुसार, दहीगाव तालुका यावल येथील राहणारे शरीफ तुराब पटेल (वय३२ वर्ष) यांनी शनिवार दि. ९ जुलै रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घरात कुणी नसतांना आपल्या राहत्या घरातील छ्ताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवुन आपली जिवनयात्रा संपवली. गल्लीतील एक व्यक्ति शरीफ पटेल यास पत्नी व दोघ मुली ही माहेरी निघुन गेल्याने जेवणाचा डब्बा घेवुन गेल्याने घरात पाहील्याने सदरचा आत्महत्याचा प्रकार उघड झाला. या घटनेची खबर मयताचा भाऊ करीम तुराब पटेल यांनी दिल्याने यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मयत पटेल यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावल ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन देशमुख यांनी केले. शरीफ पटेल यांच्यावर बकर ईदच्या दिवशी अत्यंत शोकाकुल वातावरणात समाजबांधवांच्या वतीने दफनविधी करण्यात आले.