चाळीसगाव, प्रतिनिधी | माहेरून फ्लॅट घेण्यासाठी दहा लाख रुपये घेऊन ये सांगत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी शहर पोलिस स्थानकात पतीसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
याबाबत वृत्त असे की, रिंकु दिनेश राणा (वय-४०) ह.मु. चाळीसगाव या विवाहितेचा विवाह सन: २००६ साली नागपूर येथील दिनेश विठ्ठलराव राणा यांच्याशी झाला. सुरूवातीला एक वर्ष पतीसह सासरच्या मंडळींकडून चांगली वागणूक मिळाली. मात्र नंतर फ्लॅट घेण्यासाठी तुझ्या आई-वडीलांकडून १० लाख रुपये घेऊन ये असे सांगून रिंकुचे शारीरिक व मानसिक छळ सासरच्या सदस्यांकडून आजपावेतो करण्यात आली. याप्रकरणी रिंकु दिनेश राणा हिच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात पतीसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहेत.