मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नुकतेच दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निकालात मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई माध्यमिक विद्यालयाचा निकाल ८८.८८ टक्के लागला आहे.
शुक्रवारी २ जुन रोजी दहावी शालांत परिक्षेचा निकाल दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला. या निकालात संत मुक्ताबाई माध्यमिक विद्यालयाचा निकाल जाहीर करण्यात आला. शाळेचा निकाल ८८.८८ टक्के लागून ९५ टक्के गुण मिळवून महीमा राजेंद्र पाटील ही विद्यार्थींनी पहिली आली आहे. द्वित्तीय रिध्दी प्रमोद पाटील ९२ टक्के गुण तर तृत्तीय मोनिका भागवत पाटील ९०.६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्याभारती शैक्षणिक मंडळ अमरावती संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब शेखावत, सचिव डॉ.ए.डी. चौहान, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आय. डी. पाटील, शाळेचे मुख्याध्यापक एन. डी. काटे, सर्वशिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.