जामनेर, प्रतिनिधी | राज्य सरकारने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा हि ऑनलाइन पद्धतीने घेण्यात यावी या आशयाचे निवेदन तालुका विद्यार्थी क्रांती मोर्चाच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
यावेळी निलेश चव्हाण, योगेश जाधव, अमोल चव्हाण, गोपाल शिंदे, अनिल चव्हाण, गोपाल जोशी, नीलेश तवर, राजू तवर, निखिल पाटील, चेतन तवर, राजेश राठोड आदींसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान निवेदनात सन : २०२१ व २०२२ या शैक्षणिक वर्षात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची ऑफलाइन परीक्षा रद्द करून ऑनलाईन घेण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. कारण कोरोना महामारी मुळे अनेक दिवस महाविद्यालय बंद होते. त्याच बरोबर विद्यार्थ्यांचे अभ्यास क्रम पूर्ण झालेल्या नाहीत. ऑफलाईन परीक्षा घेतली तर विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे ऑफलाईन परीक्षा न घेता ऑनलाईन परीक्षा घेण्यात यावी किंवा परीक्षा रदद् करण्यात यावे. आमच्या शैक्षणिक वर्षात आमचे ऑनलाईन शिक्षण व क्लास झालेले नाही. त्यामुळे सदर शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचेही निर्णय तात्काळ घ्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.