जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गावठी पिस्तुलसह जीवंत काडतूस सोबत बाळगून दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा कट एमआयडीसी पोलिसांनी उधळून लावला. दरम्यान, एका संशयिताचा पाठलाग करुन त्याच्या मेहरुण स्मशानभूमीजवळील बगिच्यातून मुसक्या आवळल्या. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
शहरातील मेहरुण परिसरातील स्मशानभूमीजवळील बगिच्यात संशयित विशाल राजू अहिरे रा. रामेश्वर कॉलनी, आशुतोष सुरेश मोरे वय-२१ रा. एकनाथ नगर, गोपाल चौधरी, दिक्षांत उर्फ दादू सपकाळे व शुभम धोबी हे टोळी करुन शस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यांनी लागलीच पथक तयार करुन कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार पथकाने सापळा रचून छापा टाकला असता, संशयित आशुतोष सुरेश मोरे हा पळून जात असतांना त्याचा पाठलाग करुन मुसक्या आवळल्या. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडून गावठी कट्टा व एक जीवंत काडतूस मिळून आले. त्याला न्या. केळकर यांच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला दि. १० एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
या पथकाची कामिगरी
ही कामगिरी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, पोहेकॉ जितेंद्र राजपूत, महेंद्रसिंग पाटील, पोना दत्तात्रय बडगुजर, विकास सातदिवे, योगेश बारी, पोकॉ ललित नारखेडे, पोकॉ चंद्रकांत पाटील, विशाल कोळी यांच्या पथकाने केली.