पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील दबापिंप्री येथील गावठी दारू हातभट्टीवर आज पारोळा पोलिसांनी धाड टाकून शेकडो लिटर कच्चा माल हस्तगत करण्यात आला.
तालुक्यातील दबापिंप्री येथील जागृत तरूणांनी पुढाकार घेऊन याबाबतची माहिती पारोळा पोलिसांना कळविली. पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रविंद्र बागुल यांनी धाड टाकली. यावेळी तरूणांनी जंगलात जाऊन सर्व कच्च्या मालाचे ठिकाणे पोलिसांना नेवून दाखवली. शेकडो लिटर कच्चा माल हस्तगत करण्यात आला. सर्व कच्चा माल जागेवरच नष्ट करण्यात आला आणि मिळालेले सर्व साहित्याचे जागेवर पेटवून देवून तेही नष्ट करण्यात आले. यावेळी सरपंच प्रमिलाबाई भिल, उपसरपंच सुरेश पाटील, ग्रा.पं. सदस्य विजय पाटील, दबापिंप्री पोलिस पाटील प्रकाश भागवत, रत्नापिंप्रीचे पोलिस पाटील प्रभाकर पाटील, होळपिंप्री पोलिस पाटील गौतम भालेराव, प्रविण पाटील, पो.कॉ.सुनिल वानखेडे, विजय भोई, होमगार्ड नरेंद्र पाटील, नरेंद्र बोरसे, भारत पाटील, पत्रकार रामचंद्र पाटील, मयुर पाटील, किशोर वाघ, दबापिंप्री येथील तरूण उपस्थित होते. यावेळी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.