जळगाव प्रतिनिधी । शहरात सुरू असणार्या अतिक्रमण हटाव मोहिमेत दफनभूमितील अतिक्रमण काढतांना तणाव निर्माण झाला असता अतिक्रमण काढण्यासाठी आज सायंकाळपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
महापालिकेतर्फे शहरात अतिक्रमण काढण्याची मोहिम सुरू आहे. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने गुरुवारी शहरातील पक्क्या अतिक्रमणांवर जेसीबी चालवला. कालंकामाता मंदिररोडसह खेडी परिसरात रहिवासी अतिक्रमणे तर नेरीनाका स्मशानभूमीच्या पाठीमागील दफनभूमीला लागून असलेल्या जागेत धडक कारवाई करण्यात आली. यात ४० वर्षांपासूनचे अतिक्रमण जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरू झाली. यामध्ये या भागात असणारे पत्र्यांचे शेड तोडण्यात आले.
अतिक्रमण असलेली जागा दफनभूमीसाठी असल्याचा दावा काही नागरिकांनी केला; परंतु शेतकर्यांकडून त्या जागेचा वापर केला जात असल्याने दफनविधी शेजारच्या जागेत केला जात असल्याचे सांगितले. नागरिकांनी सर्वानुमते २४ तासांची मुदत मागितली. यानुसार आज पाच वाजेपर्यंत संपूर्ण परिसर रिकामा करून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. दमर्यान, आज शुक्रवारी पाच वाजेनंतर पुन्हा कारवाई करण्यात येणार आहे.