दत्त नगरात दूषित पाणीपुरवठा ; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

 

जळगाव, प्रतिनिधी । आज महापालिकेतर्फे मेहरूण परिसरात पाणी पुवठा करण्यात आला. हा पाण्याचा पुरवठा पिवळसर स्वरूपाचा झाला असल्याची तक्रार येथील नागरिक करीत आहेत.

आज मेहरूण परिसरात महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे दत्त नगरात दूषित पाण्याचा पुरवठा करण्यात आला. हे पाणी पिवळसर स्वरूपाचे आहे. नागरिकांना कोरोना या विषाणूचा धोका असतांना या दूषित पाण्यामुळेही त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित पाण्यामुळे विविध साथीचे आजार पसरू शकतात. हीबाब लक्षात घेता अखिल कलीम पिंजारी यांनी तक्रार केली आहे. नळाद्वारे येणाऱ्या पाण्याचा वापर पिण्यासाठी येथील नागरिक करीत असतात. मात्र, आज पाणी पूर्ण खराब आल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.

Protected Content