चिंताजनक…! यावल तालुक्यात आढळले सहा कोरोनाबाधित

यावल प्रतिनिधी । कोरोनाचा प्रादुर्भाव यावल तालुक्यात दिवसेंदिवस वाढत आहे. यावल येथील कोरोनाबाधिताच्या संपर्कातील तीन तर फैजपूरातील तीन असे एकुण सहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. एकुण रूग्ण संख्या ३८ झाली असल्याची माहिती प्रभारी तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. मनिषा महाजन यांनी दिली आहे.

आरोग्य विभागाकडून मिळालेली माहिती अशी की, यावल शहरातील वसुले गल्ली मेन रोडवर एक व्यवसायीक आठवडाभरापुर्वी कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यांच्या संपर्कातील तीन जणांनाही जेटीएम न्हावी फैजपुर येथे क्वारंटाईन करण्यात आले होता. क्वारंटाईन करण्यात आल्यानंतर त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. अकराव्या दिवशी त्यांना डिस्चार्जही देण्यात आला होता. मात्र सकाळी त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने आरोग्य प्रशासनाची चांगली तारांबळ उडाली आहे. आत मिळून आलेल्या एकाच कुटुंबातील तिघांना होम क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी यांनी सांगितले. दरम्यान फेजपुर शहरात अशाच प्रकारे तीन जणांचा अहवाल पॉझीटीव्ह आल्याने तालुक्यातील पॉझीटीव्ह रुग्णांच्या संख्येचा आकडा हा ३८ वर पहोचला आहे. एकाच दिवसात सहा जणांचा स्वॅब चाचणी अहवाल पॉझीटीव्ह आल्याने व ती सर्व रुग्ण ही होम क्वारेंटाईन असले तरी तालुक्यात सर्वत्र चिंतेचे सावट पसरले आहे. आपातकालीन परिस्थितीतुन सर्वसामान्य जनतेला सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रांताधिकारी डॉ.अजीत थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार जितेन्द्र कुवर, पोलीस निरिक्षक अरूण धनवडे, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मानिषा महाजन, नगर परिषदचे मुख्याधिकारी बबन तडवी, फैजपुर नगरपरिषद प्रशासन व प्रशासकीय यंत्रणाही सज्ज आहे.

Protected Content