रावेर, प्रतिनिधी । वाळूची अवैध वाहतूक करणारे टॅक्टर-ट्रॉली सोडल्या प्रकरणी त्या महसूल पथका कडून प्रांतधिकारी कार्यालयात गुरुवारी अहवाल सादर करण्यात आला आहे. संबधितांचे खुलासे अजुन बघितले नाही सोमवारी बघुन यावर योग्य निर्णय घेणार असल्याचे प्रांतधिकारी कैलास कडलक यांनी सांगितले.
याबाबत वृत्त असे की, दि. १० फेब्रुवारी रोजी अवैध वाळूने भरलेले टॅक्टर-ट्रॉली रावेरच्या महसूल पथकाने पकडले होते. पथकाने हे टॅक्टर-ट्रॉली तहसिल कार्यालयात सुध्दा नेले होते. परंतु कोणताही दंड न घेता तहसिल कार्यालयातुन सोडुन दिले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रांतधिकारी कैलास कडलग यांनी सर्वांना खुलासे सादर करण्याचे आदेश दिले होते. अखेर पंधरा दिवसांना सर्वांच्या खुलास्यांचा अहवाल प्रांतधिकारी कार्यलायत प्राप्त झाला आहे. आता संबधित पथकाने कोणती कारणे दिली आहे.याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.