यावल प्रतिनिधी । तालुक्यातील थोरगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेत क्रांतीज्योती सावित्री बाई फुले यांच्या जंयती निमीत्ताने त्यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले व महिला शिक्षण दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व शिक्षक प्रामुख्याने हजर होते. याप्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पुजन थोरगव्हाण चे पोलीस पाटील गजानन चौधरी यांच्याहस्ते करण्यात येवून आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष घनश्याम झुरकाळे, उपाध्यक्ष निवृत्ती चौधरी, सदस्य सुरेश चौधरी, विनोद भालेराव, विनोद पाटील व ग्रामस्थ मंडळी तसेच थोरगव्हाण जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र देवरे , सहशिक्षक एकनाथ सावकारे व निलेश पाटील यांच्यासह गावातील समाजीक कार्यकर्ते व ग्रामस्थ मंडळी कार्यक्रमास उपस्थित होती.