चोपडा, प्रतिनिधी । थकीत पगार मिळावा या मागणीसाठी जिल्ह्यात सोमवार ११ मे रोजी ग्रामपंचायत कर्मचारी वैयक्तिक अन्न सत्याग्रह करतील असा इशारा आयटकने दिला आहे.
महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी महासंघ (आयटक )च्या नेतृत्वाखाली आपल्या थकीत वेतन व भत्ता मिळण्याच्या मागणीला घेवून जळगाव जिल्ह्यातील ग्राम पंचायत सर्व कर्मचारी ११ मे सोमवारला उपाशी पोटी ग्राम पंचायतीची कामे करणार असल्याची माहिती राज्य महासंघाचे सचिव कॉ. अमृत महाजन, जिल्हाध्यक्ष संतोष खरे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच ग्राम पंचायत कर्मचा-यांना जानेवारीपासुन अद्यापही ग्राम पंचायतीने वेतन व भत्ता दिलाच नाही. यापूर्वीचे पण अनेक कर्मचा-यांचा वेतन भत्ता थकीत आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना अनेकदा निवेदने दिली. पणयाकडे अधिकारी दुर्लक्ष करत असल्यांने कर्मचा-यांवर उपासमारीची पाळी आली आहे. गाव पातळीवर कोरोना (कोविड-19) महामारीच्या निर्मुलन करण्याच्या मोहिमेत अल्पशा पगारावर जिवन जगणारा हा कर्मचारी पगार थकीत असतांना आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाळत आहेत. या मोहिमेत दिवस रात्र कामे करणा-यां या कर्मचा-यांचे वेतन भत्ते थकीत ठेवून त्यांचेकडून उपाशी पोटी अधिकारी वर्ग व ग्रामपंचायत व्यवस्थापन त्यांच्याकडून काम करुन कोणते राष्ट्रीय कर्तव्य पार पाळत आहे ? अशा प्रश्नही उपस्थित होत आहे . कर्मचा-यांचे वेतन, भत्ते व इतर सेवाशर्तीची ग्रामपंचायतीकडून अंमलबजावणी करवून घेण्याची जबाबदारी ग्राम विकास विभागाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व उप मुका.अधि तसेच गट विकास अधिका-यांना क्रमबद्ध रित्या दिलेली आहे. सेवाशर्तीचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई करण्याचे अधिकार पण यांना दिलेले आहेत. शासनाने दिलेल्या या दोन्ही जबाबदारीचे पालन करण्यात हे अधिकारी असमर्थ ठरलेले आहेत. याबाबत महासंघाने यांना अनेकदा निवेदने दिली ,पण कोणतीही कार्यवाही न होणे खेदाची बाब आहे .अधिकारी वर्गाच्या अशा धोरणामुळे ग्राम पंचायत करमचा-यांत असंतोष पसरत आहे. अधिकारी वर्ग कोरोना महामारीच्या निर्मुलनाच्या कामावर असलेल्या या करमचा-यांचे “कोरोना “च्या नावावर कर्मचाऱ्यांचे शोषण करत असल्याचा आरोप जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने केला आहे. अशा अधिका-याचां जाहिर निषेध म्हणूण दि. ११ में रोजी गावोगावी एक दिवसभर अन्न सत्याग्रह ( उपाशी) करून ग्राम पंचायतीची कामे काळी फिती लावून करणार माहिती राज्याचे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ,प्रधान सचिव,जिल्हा अधिकारी व पोलिस अधीक्षक यांना निवेदनाच्या माध्यमातून दिली आहे.