यावल प्रतिनिधी । तालुक्यातील गिरडगाव किनगाव येथील एका लाकूड व्यापाऱ्यांने पाझर तलाव क्षेत्रातील विविध जातीच्या पवार ५१ जिवंत वृक्षांची बेकायदेशीरपणे तोड केल्याची तक्रार पोलीस स्टेशन आणि तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, किनगाव येथील लाकूड व्यापारी सद्दाम शहा खलील शहा यांनी १० एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास यावल तालुक्यातील गिरडगाव येथील गाव शिवारातील गट क्रमांक ३९, ४० व ४१ जिल्हा परिषदच्या लघुसिंचन विभागाद्वारे तयार करण्यात आलेल्या पाझर तलावाच्या कार्यक्षेत्रातील सुमारे ५० ते ५१ निंबाची पळस काशीद व बाभळांच्या वृक्षांची बेकायदेशीरपणे वृक्षांची बेकायदेशीर तोड केली. दरम्यान अशाप्रकारे कुठेही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे बहुमुल्य वृक्षांची थोडं करून पर्यावरणास धोका निर्माण होईल असे कृत्य केले असून सदरच्या किनगाव येथील लाकूड व्यापारी सद्दाम शहा खालील शहा यांच्याविरुद्ध शासनाने त्वरित चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी गिरडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच अलका मधुकर पाटील व पोलीस पाटील अशोक रघुनाथ पाटील यांनी तहसीलदार जितेंद्र कुवर, पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्याकडे तक्रार निवेदनाद्वारे केली. यावेळी माजी सरपंच सुरेश पाटील, भागवत पाटील, दिलीप पाटील, नामदेव पाटील, शिवाजी बोरसे, पांडुरंग पाटील केली आहे, दरम्यान गिरडगाव पाझर तलावाच्या वृक्षांच्या झालेल्या तोडीचा पंचनामा येथील मंडळ अधिकारी सचिन जगताप, ग्रामसेवक भोजराजा फालक आणि तलाठी पी.एल.पाटील यांच्यावतीने करण्यात आला आहे.