नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्याने गोत्यात आल्यामुळे रामदेव बाबांनी या प्रकरणी माफी मागितली आहे.
योग गुरू रामदेव बाबा हे अलीकडेच एका आक्षेपार्ह वक्तव्याने चर्चेत आले होते. महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात आणि काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात. असं वादग्रस्त विधान बाबा रामदेव यांनी केलं होतं. या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले. यावरून त्यांच्यावर घणाघाती टीका करण्यात आली. तर सोशल मीडियातून देखील त्यांना प्रचंड प्रमाणात ‘ट्रोल’ करण्यात आले.
दरम्यान, आता बाबा रामदेव यांनी या प्रकरणी माफी मागितली आहे. माझ्या विधानाचा गैरअर्थ काढला असल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केला आहे. तरीही त्या शब्दाने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा मागतो, असंही ते म्हणाले.