रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | रावेर पंचायत समितीत झालेल्या भ्रष्ट्राचार प्रकरणी सुरु असलेल्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी सांगितले.
आधीच विविध आरोप-प्रत्यारोपांमुळे पंचायत समितीची प्रतिमा प्रचंड मलिन झाली आहे. रावेर पंचायत समितीचा बहुचर्चीत भ्रष्ट्राचार प्रकरण राज्यभर गाजत आहे. या प्रकरणी रावेर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असुन ‘बीडीओ सहीत अठरा जण तुरुंगात आहे. तर मोठ्या अधिका-यासह ११२ जणांवर अटकेची टांगती तलवार असतांना. या प्रकरणात आता माजी मंत्री आ एकनाथराव खडसे यांनी लक्ष घातले असून या भ्रष्ट्राचार प्रकरण संदर्भात सुरु असलेल्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी नाथाभाऊ अधिवेशनात करणार आहे.