जळगाव प्रतिनिधी । किन्नर शाप देत नसून याच्या अंधश्रध्देपोटी निंबाखाली दिवे लाऊ नका असे कळकळीचे आवाहन तृतीयपंथियांचे स्थानिक गुरू राणी जान उर्फ जगन मामा यांनी केले आहे.
याबाबत वृत्त असे की, जिल्ह्यात दोन दिवसांपासून एक विचीत्र अफवा पसरली आहे. यात रावेर येथील दंगलीत एक तृतीयपंथी ठार झाला असून त्याने मरण्यापूर्वी शाप दिल्याची अफवा पसरली. यातून आपल्या मुलांना वाचवायचे असेल तर निंबाच्या झाडाखाली दिवा लावावा अशी आवईदेखील उठविण्यात आली. यामुळे जळगाव, भुसावळ, जामनेर, एरंडोल आदींसह अन्य तालुक्यांमधील हजारो महिलांनी निंबाच्या झाडाखाली दिवा लावल्याचे सोमवारी दिसून आले होते. या पार्श्वभूमिवर, तृतीयपंथियांचे स्थानिक गुरू राणी जान उर्फ जगन मामा यांनी एक व्हिडीओ जारी करून हा सर्व अंधश्रध्देचा प्रकार असून याला बळी न पडण्याचे आवाहन केले.
या आधीची दिव्याच्या अफवेबाबतची बातमी येथे क्लिक करून वाचा.
या व्हिडीओत जगन मामा म्हणाले की, तृतीयपंथी हा बददुवा नव्हे तर दुवा देण्यासाठी असतो…सर्वात मोठी बददुवा तर आम्हाला मिळालीय असे सांगत महिलांनी अफवांना बळी पडून किन्नरांच्या शापाच्या भितीमुळे निंबाखाली दिवा लावू नये असे आवाहन तृतीयपंथियांचे स्थानिक गुरू जगनमामा उर्फ राणी जान यांनी केले आहे. याप्रसंगी त्यांच्या सोबत अर्चना जान आणि अन्य सहकारी उपस्थित होते.
खाली पहा : जगनमामा यांनी जारी केलेला व्हिडीओ.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/523670045000702