‘त्या’चालकाचे निलंबन रद्द करण्यासाठी कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे साखळी उपोषण (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे विभागीय सचिव शैलेश रामकिसन नन्नवरे (चालक) यांनी सहाय्यक वाहतुक अधिक्षक मनोज तिवारी यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याने तिवारी यांचे तात्काळ निलंबन करा, चालक शैलेश नन्नवरे यांचे निलंबन तात्काळ रद्द करण्यात यावे या मागणीसाठी कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटना व विविध सामाजिक संघटना यांनी नवीन बस स्थानकाबाहेर साखळी उपोषणाला प्रारंभ केला आहे.

 

विभाग नियंत्रक यांना दिलेल्या निवेदनाचा आशय असा की,  शैलेश रामकिसन नन्नवरे चालक 19676 कास्ट्राईब संघटनेचे विभागीय सचिव यांना बेकायदेशीर नियमबाह्य कोणत्याही प्रकारची श्री.तिवारी यांना मारहाण न करतान न्नवरे यांच्यावर खोटी केस दाखल करणे, त्यांना चुकीचे पध्दतीने तिवारीवर अॅट्रासिटी गुन्हा दाखल करू नये म्हणून दबावतंत्राचा वापर करून केलेले निलंबन रद्द होणेबाबत व मनोज तिवारी स.वा.अ.यांना निलंबित करणेबाबत साखळी उपोषण  दि.14/06/2021 आमचे विभागीय सचिव शैलेश आर. नन्नवरे हे सहाय्यक वाहतुक अधिक्षक यांचेकडे कर्मचाऱ्याची समस्या मांडण्यासाठी गेले असता मनोज तिवारी स.वा.अ. यांच्याकडून बोलत असतांना तोल जावून जातीवाचक शिवीगाळ केली असता आमचे सचिव पोलीसात गुन्हा दाखल करण्यास गेले असता गुन्ह्याची नोंद  होवू नये म्हणून आगार व्यवस्थापक सिनिअर, आगार व्यवस्थापक यांनी आपल्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून आपल्या मर्जीतले कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांना अमिष व अधिकाराचा बडगा दाखवून पोलीसात मारहाणीचा खोटा गुन्हा नोंदविला व मारहाणीची घटना घडलेली नसतांना काही कर्मचाऱ्यांच्या खोटा जबाब नोंदवून चुकीचे, नियमबाह्य बेकायदेशीर निलंबित करण्यात आले आहे. संघटनेने मनोज तिवारी यांची आपणाकडे निलंबनाची मागणी केली आहे. संघटनेचे पदाधिकारी हे आपणास भेटले असता निलंबन माझ्या हातात नाही मी वरिष्ठांना आपला अर्ज व अहवाल सादर केला आहे. तरी वरिष्ठांनी अद्यापपावेतो मनोज तिवारी यांना निलंबित केलेले नाही. तरी श्री तिवारी यांना त्वरीत निलंबित करावे व शैलेश नन्नवरे कास्ट्राईब सचिव यांचे निलबन रद्द करावे अशी मागणी साखळी उपोषणप्रसंगी करण्यात आली आहे. यावेळी जनक्रांती मोर्चा जिल्हाध्यक्ष मुकुंद सपकाळे,  छावा मराठा युवा महासंघ जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे,  बामसेफ खान्देश प्रचारक सुनिता अहिरे, वीर सावरकर रिक्षा युनियन जिल्हाध्यक्ष दिलीप सपकाळे, पिपल रिपब्लिकन पार्टी जळगाव ग्रामीण जिल्हा अध्यक्ष प्रकाश मोरे, नरेंद्र नन्नवरे, सचिन माळी यांची उपस्थिती होती. तसेच संघटनेचे श्रावण सोनवणे, अजय पाटील, पोर्णिमा सुरवाडे, निलेश बिऱ्हाडे, शिरीष नन्नवरे, एस. ए. जोहरे, विजय सूरवाडे, सुधाकर सपकाळे, अक्षय बागुल, सचिन मोरे, एस. वाय. माळी आदी सहभागी झाले आहेत.

 

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3070069769985089

 

Protected Content