‘त्यांनी’ आम्हाला धमक्या देऊ नये, गद्दारांच्या यादीत माझे नाव नाही : गुलाबराव पाटील

अहमदनगर (वृत्तसंस्था) मी छत्तीस वर्षांपासून शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला धमक्या देऊ नये. मी निष्ठावंत आहे. गद्दारांच्या यादीत माझं नाव नाही, असा टोला शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी राणे पिता-पुत्राला लगावला आहे.

 

माजी मंत्री अनिल राठोड यांच्या निधनानंतर परिवाराचे सांत्वन करण्यासाठी गुलाबराव पाटील आज अहमदनगरला आले होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी नारायण राणे आणि त्यांचा मुलगा आमदार नितेश राणे यांच्यावर टीका केली. ना. पाटील पुढे म्हणाले की, भाजप खासदार नारायण राणे जेव्हा शिवसेनेत होते, तेव्हा आम्ही त्यांचे पाठीराखे होतो. त्यावेळी त्यांचे पोट्टे बनियनवर होते. त्यामुळे त्यांनी मला शिकवू नये. तेव्हा नारायण राणे फायटर बटालियनमध्ये माझे नाव घ्यायचे. आता नारायण राणेंना मी वाईट कसा वाटायला लागलो?”, असा सवाल गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला. दरम्यान, गुलाबराव पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी नारायण राणे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत, अशा शब्दात टीका केली होती. त्यांच्या या टीकेला नितेश राणे यांनी गुलाबराव कधी शुद्धीवर राहतात, याची माहिती घेऊन बोलू, असे प्रत्युत्तर दिले होते.

Protected Content