तोंडाला आवर घाला- संघाची भाजप नेत्यांना तंबी

नवी दिल्ली । भाजप नेत्यांनी तोंडाला आवर घालावा असा इशारा संघाचे वरिष्ठ पदाधिकारी दत्तात्रय होसबोले यांनी भाजप नेत्यांना देण्यात आला आहे.

नवी दिल्लीत इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रात तीन दिवसांचा अयोध्या पर्व हा कार्यक्रम सुरू आहे. कार्यक्रमाच्या आजच्या शेवटच्या दिवशी संघाचे वरिष्ठ पदाधिकारी दत्तात्रेय होसबोले यांनी भाजपच्या वाचाळ नेत्यांना कानपिचक्या दिल्या. प्रभू श्रीराम हे मर्यादापुरुषोत्तम होते. ते वचनमर्यादा पाळायचे. ही वचनमर्यादा लक्षात ठेवून भाजप नेत्यांनी तोंड सोडून बोलू नये, त्यांनी तोंडाला आवर घालावा असा सल्ला त्यांनी दिला. भाजप नेते अनुराग ठाकूर, प्रवेश वर्मा, कपिल मिश्रा आदी नेत्यांनी केलेली वक्तव्ये ही अलीकडच्या काळात वादाच्या भोवर्‍यात सापडली आहेत. या पार्श्‍वभूमिवर, संघाकडून हा इशारा देण्यात आल्याचे मानले जात आहे.

Protected Content