जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील तोंडापूर ग्रामस्थांच्या वतीने अवैध धंदे गावरान दारू, कायमस्वरूपी बंद करण्यात या मागणीचे निवेदन आज रोजी तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
तोंडापूर ग्रामपंचायतची ग्रामसभा २८ रोजी सरपंच प्रकाश सपकाळ यांच्या उपस्थितत घेण्यात आली. गावकऱ्यांनी सर्वानुमते त्यात दारु व अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी करण्यात आली होती त्या ठरावाच्या प्रति व निवेदन ३ रोजी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक, पहुर पोलिस यांना निवेदन देण्यात आले. तोंडापूर गावाची लोकसंख्या १८ हजार च्या जवळ पास आहे गावात हिंदू, मुस्लिम, जैन, मागासवर्गीय तडवि, भिल्ल तसेच सर्व लोक गुण्यागोविंदाने राहतात परंतु गेल्या काही महिन्या पासून गावात बसस्थानक परिसरात तसेच गावातील इतर ठिकाणी देशी विदेशी गावठी दारु व इतर अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत.
पोलिसांकडे तक्रार केली असता तात्पुरते स्वरूपात हे धंदे बंद होतात नंतर पुन्हा चालू केले जातात. त्यामुळे गावात वाद विवाद होत असून हाणामारी, छेडखाणी सारखे प्रकार होत असून शांतता भंग होण्याचे प्रकार वाढत आहे. बसस्थानक परिसरात दारुडे नेहमीच धुमाकूळ घालत असल्याने दारु सह अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यात यावे. यासाठी तोंडापूर येथील ग्रामस्थांनी तहसीलदार, पहुर पोलीस स्टेशन, राज्य उत्पादन शुल्क विभाग, जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी याना निवेदन देण्यात आले. त्यावेळी ग्रामस्थ राम अपार, जितेंद्र पाटील, पवन भुतेकर, चेतन पाटील, ईश्वर अपार, दत्तात्रय दांडगे, ग्रा.पं. सदस्य पांडुरंग खिल्लारे. जगन लांडगे. विकास पाटील. भरत कानडजे. संभाजी गोतमारे. सतीश बिऱ्हाडे आदि ग्रामस्थ हजर होते.