नवी दिल्ली । राहूल गांधी यांनी अध्यादेश फाडल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे राजीनामा देणार होते असा गौप्यस्फोट नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष मोंटेक सिंह अहलुवालिया यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.
अहलुवालिया यांनी आपलं पुस्तक बॅकस्टेज: द स्टोरी बिहाइन्ड इंडिया हाय ग्रोथ इयर्समध्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. यात म्हटले आहे की, मनमोहन सिंग हे अमेरिकेच्या दौर्यावर होते. २०१३मध्ये दिल्लीतल्या प्रेस क्लबमध्ये पोहोचून राहुल गांधींनी एक अध्यादेश फाडून टाकला पाहिजे, असं विधान केलं होतं. हा अध्यादेश गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकप्रतिनिधींना निवडणुकीपासून दूर ठेवणारा होता. त्यानंतर लागलीच मनमोहन सिंग पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार होते. राहुल गांधींनी सांगितलं होतं, हा अध्यादेश म्हणजे पूर्णतः बकवास असून, तो फाडून फेकून दिला पाहिजे. अमेरिकेवरून मायदेशात परतल्यानंतर मनमोहन सिंग यांनी या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली होती.
मोंटेक सिंह अहलुवालिया म्हणाले, काँग्रेस राहुल गांधींकडे पार्टीचे मोठे नेते म्हणून पाहत होती. त्यांना एक मोठी भूमिका बजावताना पाहायचं आहे. जेव्हा राहुल गांधींनी त्या अध्यादेशाला विरोध केला, त्यावेळी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना लागलीच आपली भूमिका बदलली. ज्यांनी मंत्रिमंडळात या अध्यादेशाचं समर्थन केलं होतं. अहलुवालिया त्यावेळी यूपीए सरकारमध्ये नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते. मोदी सरकारनं नियोजन आयोग रद्द केलं असून, त्याजागी नीती आयोगाची स्थापन केलेली आहे.