यावल, प्रतिनिधी । रावेर लोकसभा संपर्क प्रमुख विलास पारकर मुंबई यांनी विरावली यावल येथील जळगाव जिल्हा शिवसेना उपजिल्हाप्रमुख व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार उर्फ मुन्ना पाटील यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन झाल्यामुळे त्यांच्या दुःखात सहभागी झाले.
रावेर विधानसभा संपर्कप्रमुख मोहन मसुरकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरवाडे व शिवसेना भुसावळ तालुका प्रमुख समाधान महाजन व मुक्ताईनगर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ॲड. मनोहर खैरनार, भुसावळ तालुका विधानक्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे उपस्थित होते. या आधी चोपडा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्यासह जिल्ह्यातील मान्यवरांनी तुषार पाटील यांच्यासह तालुक्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देवुन आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.