मुंबई प्रतिनिधी । आघाडी सरकारच्या पत्रकार परिषदेला आज भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी ट्विटस्च्या माध्यमातून जोरदार उत्तर देत तुमची निष्क्रीयता हे महाराष्ट्राचे नुकसान करत असल्याची टाकी केली आहे.
महाआघाडी सरकारच्या नेत्यांनी काल सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. याला भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. त्यांनी आठ ट्विट करून सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी महाआघाडी सरकारच्या पत्रकार परिषदेतच त्यांच्या दाव्यांचे पितळ उघडे पडल्याचा दावा केला आहे. महाआघाडीचे तीन मोठे नेते एका नेत्याविरूध्द एकत्र आल्याचा उल्लेख करून हे रडवेपणाचे व नाकर्तेपणाचे लक्षण असल्याची खिल्ली त्यांनी उडविली आहे. त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या तिन्ही नेत्यांवर टीकास्त्र सोडले आहे.
आशिष शेलार यांनी केलेल ट्विटस खाली दिलेले आहेत.
विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्राला काय मिळेल आणि कसे मिळेल हे सांगितले त्यावर ऐवढी का कळ पोटात गेली.एका माणसाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला "आघाडीची तीन माणसं" धावली.घाबरताय कशाला?तुमचं अपयश,नाकर्तेपणा उघड होतो त्याला? एकास तीन हे तर भित्रे,रडव्यांचे लक्षण! करुन दाखवा,रडून नको! 1/8
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 27, 2020
महाराष्ट्रात सर्व आलबेल असल्याचे,आभासी चित्र निर्माण करणाऱ्या आघाडीच्या"तीन माणसांच्या" दाव्यांचा पर्दाफाश पत्रकारांनी त्याच जागी केला. पत्रकरांच्या पहिल्या प्रश्नातच मुंबईतील अपयश उघडे झाले आणि "तीन माणसं" एकमेकाकडे बघत बसले!
आभासी फुगा जागीच फोडणाऱ्या पत्रकारांचे आभार!! 2/8— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 27, 2020
आघाडीची "तीन माणसं" बोलली कि रडली..? कोरोना आल्यापासून हे असेच रोज रडणे सुरु आहे. कधी केंद्राच्या नावाने रडायचे.. अधी विरोधी पक्षाच्या नावानं.. आता थाबवा ही तुमची रडगाणी.. आता करुन दाखवा ना! तुम्ही मदत द्या.. शेतकऱ्यांना पँकेज द्या.. कोरोनापासुन महाराष्ट्राला वाचवा! रडू नका!! 3/8
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 27, 2020
तथाकथित अर्थतज्ज्ञ @Jayant_R_Patil हे पण आज विपर्यास करुन-करुन रडले…पण किती रडणार? खोटं किती बोलणार?अर्थतज्ज्ञ म्हणवता मग महाराष्ट्रात अर्थक्रांती घडंवा ना..कुणी रोखलंय तुम्हाला..उगाच पावटे खाल्या सारखे का वागताय?दुर्गंधी का सोडताय?
"त्यांना"जमत नसेल "तुम्ही" करुन दाखवा! 4/8— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 27, 2020
महाराष्ट्र द्रोही तर तुम्ही आहात..तुमची निष्क्रियता महाराष्ट्राचे नुकसान करतेय..महाराष्ट्राला मागे घेऊन जातेय. तुमच्या निष्क्रियतेने गिप्ट सीटी महाराष्ट्राने गमावली..सांगली ऐवजी अफ्रिकेत ऊस पिकवणे हा महाराष्ट्र द्रोह नव्हे काय?
आता उद्योग महाराष्ट्रात येऊ नयेच असे का वागताय? 5/8— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 27, 2020
गेली 20 वर्षे सत्ता असणाऱ्या, सुमारे 33 हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात मृतदेहाच्या बाजूला रुग्णांना उपचार देत आहात..@advanilparab हा आभास नाही सत्य!
आभासी रडू नका,या सत्यावर बोला!
मुंबईकर तुम्हाला विचारतोय काय करुन दाखवलंत?त्याचं उत्तर द्या! 6/8— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 27, 2020
"आघाडीची तीन माणसं" बोलली.. पण मुख्यमंत्री कुठे आहेत? उपमुख्यमंत्री कुठे आहेत? मुंबईचे पालकमंत्री कुठे आहेत? मदतीचे पँकेज कुठे आहे? निष्पाप माणसं मरत आहेत.. खाटा नाहीत, डाँक्टर नाहीत, रुग्णवाहिका नाहीत.. त्याचे काय ते सांगा.. सामान्य माणसाचे हालहाल करताय त्यावर बोला! 7/8
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 27, 2020
आघाडीच्या पत्रकार परिषदेत काँग्रेस असून नसल्यासारखे वाटले. बहुतेक पक्षाचे प्रमुख राहुल गांधी यांची सुचना तंतोतंत पाळली.
पळकुटी भूमिका आज पण दिसली!काँग्रेस पळुन दाखवतेय… किमान
बाकीच्यांनी रडून नको करून दाखवा! 8/8— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 27, 2020