जळगाव (प्रतिनिधी) शहरातील रामेश्वर कॉलनीतून गेल्या तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा मृतदेह आज सकाळी मेहरूण तलावात आढळून आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. मयत तरुणाचे नाव सुखदेव धोंडू भंडारे (वय २७) असे आहे.
या संदर्भात अधिक असे की, सुखदेव धोंडू भंडारे हा मूळ बुलढाणा जिल्ह्यातील आहे. आई-वडील नसल्यामुळे तो रामेश्वर कॉलनीत आपल्या बहिणीकडे राहत होता. १ मार्च पासून सुखदेव हा अचानक बेपत्ता झाला होता. त्याचा शोध सर्व नातेवाईक घेत होते. याच दरम्यान, आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास एक मृतदेह मेहरूण तलावात तरंगतांना आढळून आला. मृतदेह बाहेर काढल्यानंतर तो बेपत्ता सुखदेव असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.