जळगाव प्रतिनिधी । देशात ५ जून २०२० रोजी पारित केलेला किसान विरोधातील केंद्र सरकारने पारीत केलेले तीन कृषी कायदे किसान विरोधात असल्यामुळे ते तातडीने रद्द करावी, या मागणीसाठी आज सोमवार 16 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायदे हे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले सारखे आहे. हे कायदे रद्द व्हावे यासाठी २६ जानेवारी २०२० पासून ते आजपर्यंत राष्ट्रीय किसान मोर्चा व विविध संघटनांच्या वतीने अनेक आंदोलने करून शेतकरी विरोधी कायदा रद्द करण्याची मागणी केली आहे. परंतु शेतकरी विरोधी कायदा अजूनपर्यंत रद्द झालेला नाही. त्यानुसार आज सोमवार 16 ऑगस्ट रोजी देशव्यापी जनआक्रोश व जनआंदोलन मोर्चा काढण्यात येत आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ राष्ट्रवादी किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांविरोधातील तीन कायदे रद्द करा, या मागणीसाठी निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे. दरम्यान शेतकरी आणि मजूर यांच्या समस्या निराकरण करण्यासाठी केंद्राने पारित केलेले हे तीन कायदे तातडीने रद्द करावे, अन्यथा १६ सप्टेंबर २०२१ रोजी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे. या निवेदनावर राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत जगदाळे, जिल्हाध्यक्ष विश्वासराव पाटील, खानदेश विभागीय अध्यक्ष भिकन बाविस्कर, तालुकाध्यक्ष रमेश बोढरे, बामसेफचे नितीन गाडे, हरिश्चंद्र पाटील, सनिलइ पहाडे, सिराज कुरेशी, सुमित अहिरे यांच्यासह आदींनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
https://www.facebook.com/508992935887325/videos/337682051367561