बारामती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ’बांधकामाच्या चाव्या त्यांच्या हातात आहे, पण त्यांना माहिती नाही तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहे. तिजोरीच्या चाव्या जर उघडल्या तर बांधकामाला पैसे मिळतील. नाहीतर ते काय देणार घंटा’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणताच उपस्थितांनी याला जोरदार दाद दिली. मात्र यावरून त्यांनी लागलीच सावरासावर केली.
पुरंदर तालुक्यातील निंबूत येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या समता पॅलेस वातानुकूलित नुतन वस्तूच्या उदघाटन समारंभात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दत्ता मामा राज्यमंत्री आहेत. त्यांनी जिल्ह्यासाठी चांगला निधी आणला आहे. संजय जगताप आणि दत्ता मामांना सांगावे लागते. आमच्याही तालुक्यावर लक्ष ठेवा, फक्त तुम्ही राज्यमंत्री इंदापूरचे नाही. मलाच विनंती करावी लागते, मला तरी काही तरी द्या. बांधकामाच्या चाव्या त्यांच्या हातात आहे, पण त्यांना माहिती नाही तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहे. तिजोरीच्या चाव्या जर उघडल्या तर बांधकामाला पैसे मिळतील. मी तिजोरी उघडली नाही तर त्यांना काय मिळणार घंटा…’ असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. मात्र या विधानामुळे वाद होऊ शकतो हे लक्षात आल्यावर आता गाडी घसरायला लागली, आता थांबतो’ असं म्हणत अजितदादांनी भाषणाला वेगळी दिशा दिली.