अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यात नजर आणेवारी कमी करावी व सरसकट दुष्काळी अनुदान देण्यात यावे अशी मागणी अमळनेर काँग्रेस कमिटीतर्फे तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
अमळनेर तालुक्यात पावसाच्या सुरुवातीचे दीड महिने पाऊस न पडल्याने पेरणी साधारणतः १५ जुलैला झाली. त्यानंतर पावसात मोठा खंड पडला. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली व उत्पन्नावर परिणाम झाला. पुन्हा १८ ऑगस्टपासून पावसाला सुरुवात झाली व तो सतत कमी जास्त प्रमाणात १६ सप्टेंबरपर्यंत रोज पाऊस येत राहीला. त्यामुळे खरीपातील पिके ऊभवणेस(मर रोग) सुरूवात झाली. ज्वारी बाजरी, मका, कापूस पिकांवर अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. पिकांवर रोगराई पसरली तसेच जास्तीचा खंड नंतर सततचा पाऊस यामुळे कापसाच्या पिकांवर लाल्या रोग, बोंड अळीच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून उत्पन्न नगण्यच येणार आहे. तरी आपण लावलेली ५२ पैसे नजर आणेवारी ही अवास्तव असून ती कमी करावी व सरसकट नुकसान भरपाई अनुदानासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करावा ही तालुक्यातील सर्व जनतेची मागणी आहे. त्यासंदर्भात लवकरच निर्णय घेऊन तालुक्यातील शेतकऱ्यांना अशी विनंती अमळनेर काँग्रेस कमिटीतर्फे यावेळी करण्यात आली. यावेळी अमळनेर काँग्रेस तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक मनोज पाटील, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष कृषिभुषण सुरेश पाटील, काँग्रेस तालुकाकार्याध्यक्ष संभाजी पाटील, जेष्ठ नेते बन्सिलाल भागवत,प्रताप पाटील, प्रा. शाम पवार,सईद तेली, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष महेश पाटील, अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्ष अलिम मुजावर, युवक काँग्रेस शहराध्यक्ष तौसिफ तेली, शहर कार्याध्यक्ष कुणाल चौधरी, युवक काँग्रेस सचिव मयुर पाटील, युवक काँग्रेस चिटणीस राहुल गिरासे, अल्पसंख्याक उपाध्यक्ष राजु भाट, कलवंत पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.