यावल : प्रतिनिधी ।तालुक्यातील विविध गावांसह शहरात शुक्रवारच्या दिवशी भरणारा आठवडे बाजार कोरोना विषाणु संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर खबरदारीचा उपाय म्हणुन तहसील आणि नगर परिषद प्रशासनाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे .
दरम्यान काही दिवसांपासुन राज्यात कोरोनाच्या घातक दुसऱ्या टप्याने पुनश्च आगमन केले असुन , जिल्ह्यातदेखील सातत्याने बाधीत रुग्णांची संख्या वाढली आहे नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोणातुन जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहेत , यावल तालुक्यातील मोठया गावांना भरणारे आठवडे बाजारासह यावल शहरात शुक्रवारच्या दिवशी भरणारा आठवडे बाजार देखील रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला त्यासाठी जाहीर दवंडी देखील शहरात करण्यात येत आहे .
यावल शहरात आठवडे बाजारात जळगाव जिल्ह्यातुन विविध ठीकाणाहुन् मोठया प्रमाणावर व्यापारी व शेतकरी जिवनावश्यक वस्तुंची विक्री करण्यासाठी येत असतात गर्दी टाळण्यासाठी पुढील आदेश येण्यापर्यंत प्रशासनाने आठवडे बाजार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे . याची तालुक्यातील शेतकरी आणी व्यापाऱ्यांनी नोंद घ्यावी असे आवाहन नगर परिषदचे मुख्याधिकारी बबन तडवी यांनी केले आहे .