यावल, प्रतिनिधी । कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभुमीवर खबरदारीचा उपाय म्हणुन तालुक्यातील सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या माध्यमातुन कोरपावली – वड्री गावात कोरोना लसीकरणाची मोहीम राबविण्यात आली.
दरम्यान जळगाव येथे जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पोटोडे, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. समाधान वाघ, सुविधा व्यवस्थापन जिल्हा रुग्णालय जळगाव नितीन राठोड, कोल्डचैन मॅनेजर जळगाव जय कुमार कडवाल यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हास्तरीय टाक्सफोर्स सभेतील सूचनेनुसार Near – To – Home अंतर्गत प्रत्येक गावात आवश्यकतेनुसार व लससाठा उपलब्धतेनुसार लसीकरण सत्र घेण्याच्या सूचना देण्यात आलेले होत्या.
या अनुषंगाने तालुक्यातील आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे, प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडासिमचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे व डॉ. नसीमा तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील कोरपावली व वड्री येथे ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण घेण्यात आले. वड्री येथे लसीकरणाच्या वेळी जि. प. सदस्या सविता भालेराव, डॉ. गौरव भोईटे, डॉ. साजिद तडवी, डॉ. राहुल गजरे, सरपंच अजय भालेराव, उपसरपंच पंकज चौधरी, पोलीस पाटील ललिता भालेराव, सामाजिक कार्यकर्ते अतुल भालेराव व आरोग्य सेविका प्रतिभा चौधरी तर कोरपावली येथे सरपंच विलास अडकमोल, उपसरपंच हमिद पटेल, डॉ. नसीमा तडवी, डॉ. रोशनआरा शेख, ग्राम पंचायत सदस्य आरिफ तडवी, आरोग्य पर्यवेक्षिका शोभा चौधरी, आरोग्य सहाय्यक एल. जी. तडवी आदी उपस्थित होते. कोरपावली येथे ४० व वड्री येथे १०० असे १४० नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक कोवीशिल्ड लस देण्यात आली.
स्पॉट रजिस्टेशन आरोग्यसेवक बालाजी कोरडे, भुषण पाटील यांनी केले. सदर शिबिरास आशासेविका हिराबाई पांडव, हसीना तडवी, नजमा तडवी, मराबाई तडवी, सलमा तडवी, अंगणवाडी सेविका सुनंदा चौधरी, व सुलभा पाटील तसेच ग्रामपंचायत यांचे सहकार्य लाभले.