तालुका खरेदी विक्री संघाच्या तज्ञ संचालकपदी डॉ हेमंत येवले यांची निवड

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील डॉ. हेमंत जयवंतराव येवले यांची यावल तालुका खरेदी विक्री संघाच्या (शेतकरी संघ) तज्ज्ञ संचालक पदी निवड करण्यात आली. त्यांचे सर्वत्र अभिंनदन होता आये.

 

आज शुक्रवार दि. १० जून रोजी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात चेअरमन अमोल सुर्यकांत भिरुड यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सर्वसाधारण सभेमध्ये संघाचे तत्कालीन तज्ञ संचालक चंद्रशेखर चौधरी यांचा कार्यकाळ पुर्ण झाल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त संचालकपदाच्या जागेवर सर्वानुमते सघाच्या तज्ञ संचालकपदी डॉ. हेमंत येवले यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल आमदार शिरीष चौधरी , संघाचे संचालक प्रभाकर आप्पा सोनवणे, राष्ट्रवादीचे प्रा. मुकेश येवले, माजी नगराध्यक्ष शशांक देशपांडे, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, दिनूनाना पाटील, नरेंद्र नारखेडे, शरद महाजन , बोदडे नाना, विजय पाटील, नितिन चौधरी, अनिल साठे, अमोल दुसाने, देवकांत पाटील, अरुण लोखंडे, कामराज घारू व मित्र परिवार यांनी त्यांचे स्वागत करून अभिनंदन केले.

Protected Content