पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को. ऑप सोसायटी लि. शेंदुर्णी संचालित अप्पासाहेब पी. एस. पाटील माध्यमिक विद्यालय नांद्रा ता .पाचोरा विद्यालयाने पाचोरा येथील एम. एम. महाविद्यालयाच्या प्रांगणावर नुकत्याच संपन्न झालेल्या शासकीय तालुकास्तरीय मैदानी क्रिड़ा स्पधेऀत घवघवीत यश संपादन केले.
विजयी खेळाडूंमध्ये प्रामुख्याने १४ वर्ष वयोगटात गोळा फेक (प्रथम) – यामिनी चंद्रकांत कोळी, ६०० मी धावणे ( द्वितीय) – दिशा दशरथ पाटील, उंच उडी (प्रथम) – जागृती संदिप पाटील, थाळी फेक( द्वितीय) – प्रसाद नामदेव मोरे १७ वर्ष वयोगटात – १०० मि धावणे (द्वितीय) – उदय मधूकर पाटील, ८०० मि धावणे व लांब उडी (प्रथम) – वृषाली ताराचंद पाटील, १५०० मि धावणे (प्रथम) – स्नेहल रावसाहेब पाटील, ३००० मिटर धावणे (द्वितीय) – ओम परमेश्वर पवार, गोळा फेक (प्रथम) – तुषार नथ्थू कोळी, भाला फेक (द्वितीय) – पायल ज्ञानेश्वर कोळी, गोळा फेक (प्रथम) – कांचन चंद्रकांत कोळी या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
सर्व खेळाडूंची जिल्हा पातळीवर खेळण्यासाठी निवड झाली या स्पर्धा जळगांव येथे खेळविल्या जाणार आहेत. विजयी खेळाडूचे संस्थेचे चेअरमन संजय गरुड, सचिव सतिष काशीद, महिला संचालिका उज्वला काशीद, सहसचिव दिपक गरुड, वसतिगृह सचिव कैलास देशमुख तसेच स्थानिक सल्लागार समितिचे अध्यक्ष डाॅ. वाय.जी. पाटील, ग्रा. पं. सदस्य अनिल खैरनार, ग्रा. पं. सदस्य योगेश सुर्यवंशी, पुंडलिक बडगुजर (लासगाव), पत्रकार राजेंद्र पाटील, मुख्याध्यापक आर. एस. चौधरी, पर्यवेक्षक एस. व्ही. शिंदे यांचेसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनींनी खेळाडूचे अभिनंदन व कौतुक केले आहे. यशस्वी खेळाडूंना मार्गदर्शक म्हणून क्रिडा शिक्षक एस. आर. निकम, अविनाश निकम, आर. आर. बाविस्कर, मुख्याध्यापक आर. एस. चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.