तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत लिशा बोरसे प्रथम 

 

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे १४ व १७ वर्षाखालील मुला मुलींच्या तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन शाळेच्या कलादालनात करण्यात आले होते.

या बुद्धीबळ स्पर्धेत आपल्या अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करत १७ वर्ष अंतर्गत शालेय बुद्धीबळ स्पर्धेत पाचोरा येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूल (जय किरण प्रभाजी) मधील लिशा बोरसे ह्या इयत्ता १० वी च्या विद्यार्थीनीने निर्मल इंटरनॅशनल स्कूल, पाचोरा येथील खेळाडू विद्यार्थीनीचा पराभव करून प्रथम क्रमांक पटकावला.

लिशा हिस न्यु इंग्लिश मिडीयम स्कूलचे क्रिडा शिक्षक निवृत्ती तांदळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. लिशा हिच्या यशाबद्दल न्यु इंग्लिश मिडीयम स्कूलचे अध्यक्ष दिनेश बोथरा, उपाध्यक्ष गिरीष कुलकर्णी, सचिव जीवन जैन, रितेश ललवानी, लालचंद केसवानी, जगदीश खिलोशिया, शिक्षक अतुल चित्ते सह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

Protected Content