मुक्ताईनगरच्या उपविभागीय पोलीस अधिकारीपदी प्रताप शिकारे

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील उपविभागीय पोलीस अधिकारीपदी प्रताप शिकारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून मुक्ताईनगर उपविभागीय अधिकारीपद हे रिक्त होते. या पदावर नेमकी कुणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता लागून होती. या अनुषंगाने या पदावर प्रताप शिकारे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

प्रताप शिकारे हे जळगाव येथील औद्योगीक वसाहत पोलीस स्थानकात निरिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांना अलीकडेच डीवायएसपीपदी बढती मिळाली असून पहिली नियुक्ती ही मुक्ताईनगर उपविभागात मिळालेली आहे. या माध्यमातून आता मुक्ताईनगर उपविभागाला अधिकारी मिळाले आहेत.

Protected Content