पहूर, ता . जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नुकत्याच जळगाव येथे झालेल्या जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत येथील सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या विद्यार्थीनींनी घवघवीत यश संपादन केले.
जळगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात आज झालेल्या जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत पहूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या चार विद्यार्थिनींनी सुवर्णपदकांची दमदार कमाई करत शाळेच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला आहे. पहुर येथील सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या वर्षा हरिभाऊ राऊत, तृप्ती हिरालाल घोंगडे;आकांक्षा बळीराम जाधव आणि नंदिनी रमेश सोनवणे या विद्यार्थिनींनी जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केले.
यासोबत निकिता योगेश घोंगडे या विद्यार्थिनीने रोप्य पदकाची कमाई केली. या सर्व विद्यार्थीनींची तारखेला धुळे येथे होणार्या विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत निवड करण्यात आली आहे.त्यांना क्रीडा शिक्षक तथा तायक्वांदो प्रशिक्षक हरिभाऊ राऊत यांचे मार्गदर्शन लाभले . त्यांच्या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी रामकृष्ण लोहार , शिक्षण विस्तार अधिकारी विजय सरोदे, शालेय पोषण आहार अधीक्षक विष्णू काळे, केंद्रप्रमुख भानुदास तायडे, संस्थेचे अध्यक्ष बाबुराव घोंगडे, सचिव भगवान घोंगडे, मुख्याध्यापिका व्ही . व्ही . घोंगडे ,श्रीकृष्ण चौधरी कल्पना बनकर यांच्यासह शिक्षक पालकांनी अभिनंदन केले आहे.