भुसावळ प्रतिनिधी । येथील ताप्ती पब्लिक स्कूल मध्ये जगतिक महिला दिन व होळी निमित्त कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीरोग तज्ञ डॉक्टर सुजाता केळकर यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी डॉक्टर केळकर यानी महिला सबलीकरण सोबतच स्त्रीयानी आपल्या आरोग्याची कशी काळजी घेतली पहिजे हे समजवून सांगीतले, प्रसंगी महिलाना स्व सरक्षणाचे धडे देण्यात आले. प्राचार्या नीना कटलर यानी मार्गदर्शन करताना महिला एकजुटीचे महत्व पटवून दिले. तसेच एकमेकींना मदत करून पुढ़े जाण्याचे आवाहन केले. रंग खेळून कार्यक्रमाची सांगता झाली. सर्व शिक्षकांनी सहकारी यानी कार्यक्रम यशस्वी करण्यासठी परिश्रम घेतले. सुत्रसंचलन कय्युम शेख यांनी तर आभार प्राचार्य निना काटलर यांनी मानले.