जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – जिल्ह्यात एप्रिल महिन्यात तापमानाचा पार चांगलाच चढता आहे. शनिवारी ४५ अंशाच्यावर तापमानाची नोंद झाली असून फैजपूर, मुक्ताईनगर, रावेर, वरणगाव येथे ४६ अंश तापमान नोंदवले गेले आहे .
जिल्ह्यात यावर्षी डिसेंबर-जानेवारी दरम्यान तुरळक प्रमाणात काही भागात बेमोसमी पावसाने हजेरी लावल्यामुळे काही दिवस तापमान स्थिर होते. परंतु त्यानंतर मात्र फेबृवारी अखेरीपासुनच तापमान वाढण्यास सुरुवात झाली होती. मार्च महिन्यात
तापमानाने ४० पार करीत तापमानाने कडक उन्हाची तीव्रतेची चुणूक दाखवली आहे. शिवाय मार्च अखेरीस हवामान विभागाने देखील उष्णतेची लाट येणार असल्याचे संकेत दिले होते. जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून तापमानाचा आलेख चढता आहे.
शनिवारी तापमानाने ४५ अंशाचा टप्पा पार केला असून सर्वात जास्त फैजपूर, मुक्ताईनगर, रावेर, वरणगाव येथे ४६ तर जळगाव आणि भुसावळ येथे ४५.६ तापमानाची नोंद तर अमळनेर, भडगाव, बोदवड, धरणगाव, पारोळा, पाचोरा, यावल ४५ आणि सर्वात कमी चाळीसगाव – ४१अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आगामी १५ एप्रिल पर्यंत तरी तापमानाचा पारा हा ४३ ते ४५ अंशाच्या दरम्यान राहणार असल्याचे वेलनेस वेदर फौंडेशनचे हवामान अभ्यासक निलेश गोरे यांनी म्हटले आहे.