तळेगाव येथे वृद्ध महिलेचा भाड्यांचे रॅक पडून मृत्यू

11c3685b c98c 4107 b0d7 5d24b8e33140

जामनेर, प्रतिनिधी | तालुक्यातील तळेगाव येथील एका वृद्ध महिलेचा घरातील सामानाची आवार-सावर करीत असताना भांड्याचे रँक अंगावर पडल्याने मृत्यू झाल्याची घटना आज (दि.७) घडली.

 

सविस्तर माहिती अशी की, तळेगाव येथील खंडु दांडगे यांच्या नातीचे दि.५ रोजी लग्न झाले. ते लग्न आटोपल्यानंतर त्यांच्या पत्नी कमलबाई (वय ७५) या घरात भांड्यांची आवरसावर करीत असताना घरातील भांड्यांचे रॅक अंगावर पडल्याने जखमी झाल्या. त्यामुळे त्यांचे जळगाव येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती दोन मुले, चार मुली, तीन सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

 

Protected Content