भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळ- तालुक्यातील तळवेल येथील बसस्थानक परिसरातील मोकळ्या जागेतून ट्रॅक्टरची ट्रॉली अज्ञात चोरट्याने चोरून येण्याची घटना घडली आहे. यासंदर्भात शुक्रवारी वरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मधुकर पुंडलिक पाटील (वय-७२, रा.विठ्ठल मंदिर वार्ड, तळवेल तालुका भुसावळ) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांनी त्यांच्या मालकीची ट्रॅक्टरची ट्राली क्रमांक (एमएच १९ बीक्यू २४४२) ही गावातील बसस्थानकाजवळ असलेल्या मोकळ्या जागेत पार्किंग करून लावली होती. ३ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता ते ४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी पार्किंगला लावलेली ४० हजार रुपये किमतीची ट्रॅक्टरची ट्रॉली अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मधुकर पाटील यांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु ट्रॉलीबद्दल कुठलीही माहिती मिळाली नाही. अखेर शुक्रवारी १२ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात दहा घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रमोद कंखरे हे करीत आहे.