रत्नागिरी | वरूण सरदेसाई हा आपल्यावर हल्ला करण्यासाठी आला होता, तो आता पुन्हा आला तर परत जाणार नसल्याचा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला. तर दिशा सालीयनसह अनेक प्रकरणे देखील आता आपण बाहेर काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जनआशिर्वाद यात्रा पुन्हा सुरू करतांना व्यापार्यांशी संवाद साधतांना नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीका टाळली होती. यानंतर मात्र त्यांनी भाजपच्या मेळाव्यात पुन्हा शिवसेनेला टार्गेट केले. ते म्हणाले की, राणे पुढे म्हणाले की, आमच्या घरावर हल्ला करणारा मुख्यमंत्र्यांचा नातलग आहे, त्यामुळे त्याला अटक होत नाही. तो काय आणून देतो, त्यामुळे त्याची एवढी वट ? कुठल्याही नेत्याला जो पोलीस बंदोबस्त नाही तेव्हढा त्याला दिला आहे, असे राणे म्हणाले. तसेच, वरुण सरदेसाइनं आंदोलनादरम्यान चांगलाच मार खाल्ला. एवढे पोलीस असून तिथल्या आमच्या मुलांनी एव्हढा चोपला ना त्याला…आता परत आला तर परत नाही जाणार, असा इशारा नारायण राणेंनी दिला.
राणे पुढे म्हणाले की, आपल्या बंधूच्या पत्नीवर म्हणजे वहिनीवर ऍसिड फेकायला कुणी सांगितलं पोराला? काय संस्कार? आपल्याच भावाच्या पत्नीवर ऍसिड फेकलं. ही प्रकरणं मी टप्प्याटप्प्याने काढणार. सुशांतची केस संपली नाही आहे. दिशा सालियान प्रकरण अजूनही बाकी आहे. आम्ही भारतीय नागरिक आहोत. तुम्हाला जो कायदा तो आम्हालाही आहे. दादागिरी करू नका. तो तुमचा पिंड आहे. तुम्ही आम्हाला अनुभवलं आहे. आमच्या वाटेला जाऊ नका. आता पूर्वीसारखा दोन दिवसात आवाज खणखणीत झाल्यानंतर वाजवणार. असा दमही त्यांनी दिला.